What is an Article ?
Articles
- a
- an
- the
- उपपदांचे दोन प्रकार असतात.
- Indefinite Articles
- a
- an
- the
नियम :-
1. a ( ए,अ)
- ज्या शब्दाच्या आधी a उपपद वापरायचे आहे ते सामान्य नाम असायला हवे.
- ते सामान्य नाम हे countable असायला पाहिजे.
- सामान्य नाम हे एकवचनी पाहिजे.
- सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली पाहिजे.
This is a tree.
It is a flower.
- Countable Things = अशा वस्तू ज्यांना आपन संखेने मोजू शकतो.
- इंग्रजीत एकून २१ व्यंजन आहेत.
- सामान्य नामाची सुरुवात जर स्वराने झालेली असेल पण त्याचा उच्यार हा व्यंजना सारखा होत असेल, तर त्यापुर्वी a उपपद वापरतात.
- एखाद्या सामान्य नामापुर्वी जर विशेषण असेल आणि त्या विशेषणाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असेल तर त्यापुर्वी a उपपद वापरतात.
2. an (अँन)
- ज्या शब्दाच्या आधी an उपपद वापरायचे आहे ते सामान्य नाम असायला हवे.
- ते सामान्य नाम हे countable असायला पाहिजे.
- सामान्य नाम हे एकवचनी पाहिजे.
- सामान्य नामाची सुरुवात स्वराने झालेली पाहिजे.
This is an ox.
It is an inkpot.
- इंग्रजीत एकून 5 स्वर आहेत
- सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने झालेली असेल पण त्याचा उच्यार हा स्वरासारखा होत असेल, तर त्यापुर्वी an उपपद वापरतात.
- एखाद्या सामान्य नामापुर्वी जर विशेषण असेल आणि त्या विशेषणाची सुरुवात ही स्वराने झालेली असेल तर त्यापुर्वी an उपपद वापरतात.
3. the (द, दी)
- ज्या शब्दाच्या आधी the उपपद वापरायचे आहे ते सामान्य नाम असायला हवे.
- ते सामान्य नाम हे countable किंवा uncountable असायला पाहिजे.
- सामान्य नाम हे एकवचनी किंवा अनेकवचनी पाहिजे.
- दिशांच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- नद्यांच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- पर्वतांच्या नावाआधी the उपपद वापरतात.
- समुद्रांच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- सुर्यकुलातील वस्तूंच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- धार्मिक ग्रंथाच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- जगातील एकमेव वस्तूंच्या नावापुर्वी the उपपद वापरतात.
- Superlative Degree मध्ये विशेषनाच्या तिसरा रुपापुर्वी the उपपद वापरतात.
- डावी बाजू - उजवी बाजू असा उल्लेख करतांना the उपपद वापरतात.
- क्रमवाचक संख्या विशेषणांच्य़ा पुर्वी the उपपद वापरतात.
- the हे उपपद Same या शब्दापुर्वी वापरतात.
- the हे उपपद देशवासी यांच्या नावापुर्वी वापरतात.
Comments
Post a Comment